एएन राव यांच्यावर अमेरिका काढणार टपाल तिकीट

By Admin | Updated: August 31, 2014 23:49 IST2014-08-31T23:49:09+5:302014-08-31T23:49:09+5:30

ख्यातनाम अभिनेते दिवंगत अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या सन्मानार्थ अमेरिका टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. अक्किनेनी फाऊंडेशन आॅफ अमेरिकाने ही घोषणा केली.

AN Rao to send US postal ticket | एएन राव यांच्यावर अमेरिका काढणार टपाल तिकीट

एएन राव यांच्यावर अमेरिका काढणार टपाल तिकीट

हैदराबाद : ख्यातनाम अभिनेते दिवंगत अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या सन्मानार्थ अमेरिका टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. अक्किनेनी फाऊंडेशन आॅफ अमेरिकाने ही घोषणा केली. भारतीय अभिनेत्याच्या स्मरणार्थ टपाल तिकीट निघण्याची ही पहिलीच वेळ आहे. या तिकीट प्रकाशनासाठी फाऊंडेशन २० सप्टेंबर रोजी डल्लास (टेक्सास) येथे खास समारंभ आयोजित करणार आहे. भारतातही या तिकिटाच्या प्रकाशनाचा समारंभ आयोजित करण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. अक्किनेनी नागेश्वर राव यांचे यावर्षी २२ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांनी तेलगू, तामिळ आणि हिंदी भाषेत मिळून २५५ चित्रपटांत काम केले.

Web Title: AN Rao to send US postal ticket