प्रेयसीसाठी स्वतःच्या अपहरणाचा कट, आईला मागितली 2 लाखांची खंडणी

By Admin | Updated: January 31, 2017 19:38 IST2017-01-31T19:24:59+5:302017-01-31T19:38:35+5:30

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा कट रचला आणि स्वतःच्या विधवा आईला 2 लाखांची खंडणी मागितली

The ransom of 2 lakhs is sought for the kidnapping of a girl for her love affair | प्रेयसीसाठी स्वतःच्या अपहरणाचा कट, आईला मागितली 2 लाखांची खंडणी

प्रेयसीसाठी स्वतःच्या अपहरणाचा कट, आईला मागितली 2 लाखांची खंडणी

>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 31 - प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी एका तरूणाने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये ही घटना घडली आहे. या तरूणाने  मित्रांच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला आणि स्वतःच्या विधवा आईला 2 लाखांची खंडणी मागितली. व्यूहरचना आखून पोलिसांनी या तरूणासह त्याला मदत करणा-या मित्रांना अटक केली. 
 
चंदोली जिल्ह्यातील धानापूर गावातील 22 वर्षाचा निशू कुमार 28 जानेवारीच्या सकाळपासून बेपत्ता होता. शोधाशोध करूनही त्याचा काही पत्ता लागला नाही म्हणून त्याच्या आईने तरूणाच्या काकांना याबाबत माहिती देऊन अलीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  दुस-या दिवशी त्याच्या आईला मुलाचं अपहरण झालं असून त्याला सोडवण्यासाठी 2 लाख रूपये द्यावे असा फोन आला. 
 
त्यानंतर आईने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी योग्य ते जाळं आखून केवळ 24 तासाच्या आता निशूला अटक केली. "आपण एका मुलीवर प्रेम करतो तिचं लग्न ठरलं होतं त्यामुळे तिला पळवण्यासाठी हा अपहरणाचा कट रचला. तिला पळवून नेऊन दुस-या शहरात जाऊन नवं आयुष्य सुरू करण्याचा  विचार होता'' अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.  त्याच्या मित्रांनी यामध्ये त्याची मदत केली आणि खंडणीसाठी घरी  फोन केला. पोलिसांनी त्याच्या मित्रांनाही अटक केली आहे. 

Web Title: The ransom of 2 lakhs is sought for the kidnapping of a girl for her love affair