शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

"क्रीडा इतिहासातील काळा दिवस, द्वेषी षडयंत्र; देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:23 IST

Vinesh Phogat : विनेश फोगट अपात्र झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील यावरून हल्लाबोल केला आहे.

विनेश फोगटला महिलांच्या ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं आहे. वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा अधिक वजन असल्याने विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगट बेशुद्ध झाल्याने तिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

विनेश फोगट अपात्र झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील यावरून हल्लाबोल केला आहे. रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "१४० कोटी भारतीयांना धक्का बसला आहे, हा क्रीडा इतिहासातील "काळा दिवस" ​​आहे. हे एक मोठं “द्वेषी षडयंत्र” आहे, आधी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि नंतर मोदीजींचे आवडते भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी देशाच्या विश्वविजेत्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी देशाला त्रास देण्यास सुरुवात केली."

"मोदी सरकारने या मुलीवर एफआयआर नोंदवला. विनेश फोगटने धैर्य, शौर्य आणि संयम कधीही गमावला नाही, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगातील अजिंक्य कुस्तीपटू युई सुसाकी आणि इतर दोन चॅम्पियन कुस्तीपटूंना पराभूत केलं आणि देशाचा तिरंगा फडकवला, परंतु षडयंत्र करणाऱ्यांना हे देखील आवडलं नाही. विनेश फोगटचा विजय कोण पचवू शकलं नाही?, हरियाणाच्या आणि देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला? सत्तेचा दुरुपयोग कोणी केला? कोणाचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न झाला?" असे सवाल देखील विचारले आहेत. 

"...पण हे जाणून घ्या की हरियाणा आणि देशातील प्रत्येक जण तिच्यासोबत आहे, आमच्यासाठी ती ऑलिम्पिक गोल्ड मेडल विनर आहे. षडयंत्राचा नक्कीच पर्दाफाश होईल. चेहरे उघड होतील. विनेश, देश म्हणतोय...तू खूप लढली आहेस, भारताची कन्या आहेस" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. विनेशने ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून इतिहास रचला होता. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीcongressकाँग्रेस