रामटेक....एसटी
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30
एसटी चालकांना आवर घाला

रामटेक....एसटी
ए टी चालकांना आवर घालानगराध्यक्ष, सरपंचांची मागणी : आगार व्यवस्थापकांना निवेदनरामटेक : एसटी महामंडळाच्या स्थानिक आगाराचे अनेक एसटी चालक बेधुंद बस चालवीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशा बेजबाबदार चालकांवर कारवाई करून एसटी नियंत्रित गतीने चालविण्याचे निर्देश त्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी नगराध्यक्ष तसेच शीतलवाडी व वाहीटोला ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे. रामटेक ते मनसर हा रस्ता अरुंद असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहीटोला या बसथांब्याहून चिमुकले विद्यार्थी, महिला कर्मचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहनचालक आदी रामटेक शहरात दररोज ये-जा करतात. सदर मार्ग अतिशय वर्दळीचा असून, रस्त्यावर मोठी गर्दी असते. सकाळी ९ ते ११ तसेच सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान या मार्गावरून अनेक एसटी चालक सुसाट एसटी चालवितात. त्यामुळे विद्यार्थी व महिला घाबरतात. अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अरुंद रस्ता व वर्दळीचे प्रमाण लक्षात घेता, आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकांना सदर मार्गावरून नियंत्रितपणे एसटी चालविण्याबाबत निर्देश द्यावेत, जेणेकरून मार्गात अपघात घडणार नाहीत, अशी मागणी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, शीतलवाडीच्या सरपंच योगिता गायकवाड, वाहीटोला येथील सरपंच नंदा मस्के, माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, नगरसेवक विनायक सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोजने आदींच्या शिष्टमंडळाने केली आहे. (प्रतिनिधी)