रामटेक... सखी मंच
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:18+5:302015-02-15T22:36:18+5:30
होम मिनिस्टर गेम शोमध्ये रंगल्या सखी

रामटेक... सखी मंच
ह म मिनिस्टर गेम शोमध्ये रंगल्या सखीरामटेक येथे सभासद नोंदणीला व्यापक प्रतिसाद रामटेक : लोकमत सखी मंच रामटेक शाखेच्यावतीने स्थानिक राजीव गांधी सभागृहात सखींसाठी होम मिनिस्टर या गेम शोचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सखींसाठी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला. स्पर्धेत छाया वंजारी यांनी पैठणी पटकावली. यावेळी सखी मंचच्या सभासद नोंदणीलादेखील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला. सखींसाठी राजीव गांधी सभागृहात होम मिनिस्टरचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सखींनी भरघोस पाठिंबा देत सहभाग घेतला. या निमित्ताने विविध खेळ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. विजेत्यांना विविध पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांमध्ये नेत्रा डोंगरे, इंदू कोडवते, संगीता भलमे, आशा नवघरे, अर्चना राऊत, निशा बाकडे आणि पैठणी विजेत्या छाया वंजारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन सखी मंचच्या शोभा अडामे, सविता बांते आणि नितू अहिरकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)