रामटेकचे रस्ते खड्ड्यात.. जोड

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30

शहरातील सिव्हील लाईन भागात नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांचे वास्तव्य आहे. परंतु सिव्हील लाईनच्या रस्त्यावर चालणेही मुश्कील व्हावे, हाच रामटेक शहराचा विकास काय, रामटेक हे तीर्थस्थळ आहे. या मार्गाने हजारो भाविक रोज ये-जा करतात. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर भगवान शांतीनाथ यांचे मंदिर जेथे आहे त्यास शांतीनाथ परिसर म्हणतात. येथेही नित्यनेमाने हजारो भाविक येतात. या मंदिराच्या दिशेने येणारे सर्व रस्ते देखील जागोजागी उखडले आहेत. पापधुपेश्वर ते शांतीनाथ रस्त्याची दुर्दशा ही गेल्या अनेक वर्षांची आहे. या वॉर्डाचे नगरसेवक बिकेंद्र महाजन सांगतात की, गेल्या २० वर्षांपासून हा रस्ता बनलेला नाही. अशी मुख्य रस्त्यांची अवस्था आहे तर इतर रस्त्यांबाबत तर कल्पना न केलेलीच बरी. (तालुका प्रतिनिधी)

Ramtek road potholes .. | रामटेकचे रस्ते खड्ड्यात.. जोड

रामटेकचे रस्ते खड्ड्यात.. जोड

रातील सिव्हील लाईन भागात नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांचे वास्तव्य आहे. परंतु सिव्हील लाईनच्या रस्त्यावर चालणेही मुश्कील व्हावे, हाच रामटेक शहराचा विकास काय, रामटेक हे तीर्थस्थळ आहे. या मार्गाने हजारो भाविक रोज ये-जा करतात. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर भगवान शांतीनाथ यांचे मंदिर जेथे आहे त्यास शांतीनाथ परिसर म्हणतात. येथेही नित्यनेमाने हजारो भाविक येतात. या मंदिराच्या दिशेने येणारे सर्व रस्ते देखील जागोजागी उखडले आहेत. पापधुपेश्वर ते शांतीनाथ रस्त्याची दुर्दशा ही गेल्या अनेक वर्षांची आहे. या वॉर्डाचे नगरसेवक बिकेंद्र महाजन सांगतात की, गेल्या २० वर्षांपासून हा रस्ता बनलेला नाही. अशी मुख्य रस्त्यांची अवस्था आहे तर इतर रस्त्यांबाबत तर कल्पना न केलेलीच बरी. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ramtek road potholes ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.