शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रामसेतू काल्पनिक नाही? सेतूच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 14:18 IST

भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. देशातील हिंदुत्ववादी संघटना रामायण आणि रामचरित मानसामध्ये उल्लेख असलेला कथित रामसेतू हाच असल्याचा दावा करतो. तर विज्ञानवादी मंडळी ही केवळ कल्पना असून, असा कोणताही सेतू नसल्याचे सांगत असते.  दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या या सेतूबाबत विज्ञानविषयक कार्यक्रम तयार करणाऱ्य  अमेरिकेच्या एका सायन्स चॅनेलचे शास्त्रज्ञ आणि पुरातत्व विभागाने तयार केलेला अहवाल समोर आला आहे. या चॅनेलने रामसेतूच्या अस्तित्वाविषयी पुराव्यासह दावा केला आहे. रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 30 मैल क्षेत्रावर परसलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. मात्र  येथे असलेले दगड सुमारे 7 हजार वर्षे जुने असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.   हिंदू धर्मग्रंथांनुसार श्रीरामांनी लंकेवर स्वारी करताना रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या भूमीपर्यंत दगडांचा सेतू बांधल्याचा उल्लेख आहे. समुद्रात असलेल्या या सेतूची खोली ही 3 फुटांपासून 30 फुटांपर्यंत आहे. भारतात याला रामसेतू तर जगभरात अॅडम्स ब्रिज या नावाने ओळखले जाते.  2007 साली ही दगडांची मालिका तोडून जहाजांसाठी मार्ग बनवण्याचा घाट सरकारने घातला होता. तसेच रामसेतूबाबत काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रावरून मोठा वादही झाला होता.  रामसेतूबाबत शास्त्रज्ञांचा दावा - रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नाही- हिंदू धर्मग्रंथांनुसार प्रभू श्रीरामांनी असाच सेतू बनवल्याचा उल्लेख- येथे असलेले दगड सुमारे 7 हजार वर्षे जुने - हा सेतू नैसर्गिक नाही मानवनिर्मित- रामसेतूवरील दगड प्राचीन आणि इतरांपेक्षा वेगळे- रामसेतूसाठी वापरलेले दगड दुसरीकडून आणण्यात आले असावेत   

टॅग्स :HinduismहिंदुइझमIndiaभारतSri Lankaश्रीलंका