आंध्रात आरक्षणावरून हिंसाचार, रेल्वे पेटविली
By Admin | Updated: January 31, 2016 22:00 IST2016-01-31T22:00:57+5:302016-01-31T22:00:57+5:30
आंध्र प्रदेशमधील कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय (बीसी) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले.

आंध्रात आरक्षणावरून हिंसाचार, रेल्वे पेटविली
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ३१ - आंध्र प्रदेशमधील कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय (बीसी) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. आंदोलनकर्त्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील टुनी रेल्वे स्थानकावर आलेल्या रत्नांचल एक्स्प्रेसला आग लावली. यात एक्स्प्रेसचे चार डबे जळून खाक झाले. या आंदोलनामुळे विजयवाडा आणि विशाखापट्टणमदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प पडली. आंदोलनकर्त्यांनी एक्स्प्रेसला आग लावण्याआधीच डब्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यामुळे अनर्थ टळला.