शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

राफेलवरून हक्कभंगाचे अस्त्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 04:55 IST

किमतीवरून दिशाभूल; काँग्रेस व भाजपा यांच्यात जुंपली

नवी दिल्ली : फ्रान्सकडून घ्यायच्या राफेल लढाऊ विमानांंच्या किमतीवरून काँग्रेस आणि भाजपा यांच्यात गेल्या आठवड्यात लोकसभेतील हक्कभंग ठरावावरील चर्चेपासून सुरू झालेले वाक्युद्ध सोमवारीही सुरूच राहिले व दोन्ही पक्षांनी परस्परांवर हक्कभंगाचे अस्त्र उगारले.राफेल विमान खरेदी करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर ‘खोटेनाटे’ आरोप करून, सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल निशिकांत दुबे, अनुराग ठाकूर, दुष्यंत सिंग आणि प्रल्हाद जोशी या भाजपा सदस्यांनी लोकसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग ठरावाची नोटीस दिली. प्रश्नोत्तराचा तास संपताच दुबे यांनी या नोटिशीचा विषय काढला, तेव्हा काँग्रेस सदस्यांनी आरडाओरड करून त्यास विरोध केला. ‘मला नोटीस मिळाली आहे. तिचा अभ्यास करून मी तुम्हाला कळवीन,’ असे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भाजपा सदस्यांना सांगितले.भाजपाने काँग्रेसचे म्हणणे खोडून काढलेआधीच्या ‘संपुआ’ सरकारने केलेला राफेल करार मोदी सरकारने नव्याने केल्याने, त्या विमानांची किंमत चौपटीने वाढली, असा काँग्रेसचा आरोप आहे. मात्र, करारातील गोपनीयतेच्या कलमामुळे विमानांची किंमत उघड करता येणार नाही, असे संरक्षणमंत्री सीतारामन यांचे म्हणणे आहे.अविश्वास ठरावावरील भाषणात राहुल गांधी यांनी राफेल करारात अशी गोपनीयतेची कोणतीही अट नसल्याचे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या हवाल्याने सांगून मोदी व सीतारामन दिशाभूल करीत आहेत, असा आरोप केला होता. फ्रान्स सरकारने लगेचच एक निवेदन प्रसिद्ध करून राहुल यांचे म्हणणे खोडून काढले होते.किंमत गोपनीय ठेवण्याची अट नाहीभाजपाने राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. तिला काटशह देण्यासाठी काँग्रेसही हक्कभंग आणण्याच्या विचारात आहे. मात्र, तो मोदी व सीतारामन यांच्यावर आणायचा की फक्त सीतारामन यांच्यावर आणायचा, हे अद्याप ठरलेले नाही. माजी संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्थनी, आनंद शर्मा व रणदीप सुरजेवाला यांनी प्रवक्त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. फ्रान्ससोबत झालेल्या करारात विमानांची किंमत गोपनीय ठेवण्याची अट नाही. सरकार दिशाभूल करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला व सरकारला किंमत जाहीर करावीच लागेल, असा आग्रह धरला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाLoksabhaलोकसभा