शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:57 IST

Ahmedabad Plane Crash : विश्वास रमेश यांना अपघाताचा मोठा मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे ते सध्या माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

अहमदाबाद विमान अपघातातून एकमेव वाचलेले प्रवासी, दीवचे रहिवासी आणि ब्रिटिश नागरिक विश्वास रमेश अखेर आपल्या घरी परतले आहेत. मात्र, ३७१ किलोमीटरचा प्रवास करून दीव येथील घरी पोहोचल्यानंतरही त्यांना अपघाताचा आणि त्यात गमावलेल्या भावाचा धक्का पचवता आलेला नाही. भाऊ अजय रमेशचा मृतदेह घेऊन जाताना ते बेशुद्ध पडले होते आणि त्यांना रडू कोसळले, हे दृश्य हृदयद्रावक होते.

या सर्वात भीषण विमान अपघातातून विश्वास रमेश यांचा बचाव हा केवळ एक चमत्कार मानला जात आहे. एअर इंडियाच्या 'AI-१७१' विमानाला आग लागून ते कोसळले असताना, आपण कसे बचवलो, हे त्यांना स्वतःलाही समजत नाहीये. दीवमधील त्यांच्या घराबाहेर आता माध्यमांचा गराडा पडला असून, 'पीपली लाईव्ह' चित्रपटातील दृश्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद पोलिसांनी त्यांचे निवेदन नोंदवले असले तरी, ते आता लोकांमध्ये आकर्षण आणि कुतूहलाचे केंद्र बनले आहेत. प्रत्येकजण या एकमेव वाचलेल्या प्रवाशाला भेटण्यास उत्सुक आहे.

'लकी मॅन'च्या डोळ्यांतून अश्रू थांबेनाविश्वास रमेश यांना अपघाताचा मोठा मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे ते सध्या माध्यमांपासून दूर राहणे पसंत करत आहे. ते स्वतः बचावले असले तरी, या दुर्घटनेत त्यांनी आपला भाऊ अजय रमेश गमावला आहे. अजयच्या दुःखद निधनानंतर विश्वास रमेशच्या कुटुंबातील मित्र आणि नातेवाईक सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचत आहेत. मात्र, अद्याप धक्क्यातून सावरले नसतानाच लोकांचे आणि माध्यमांचे प्रश्न त्यांना भंडावून सोडत आहेत. यामुळे त्यांचे घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे.  

विश्वास रमेश यांच्या कुटुंबात त्यांच्या पालकांव्यतिरिक्त एकूण चार भाऊ होते. अजयच्या निधनानंतर आता विश्वास रमेश आणि त्यांचे इतर दोन भाऊ नील आणि सनी असे तिघेच उरले आहेत. कुटुंबाच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास रमेश यांचा लंडनमध्ये कपड्यांचा व्यवसाय होता, जो त्यांनी काही काळापूर्वी बंद केला. दीवमधील त्यांच्या कुटुंबाकडे मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही बोटी आहेत. ब्रिटिश नागरिकत्व असलेले विश्वास रमेश काही महिने लंडनमध्ये आणि काही महिने दीवमध्ये राहत असत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात