रमेश कदम यांचा रक्तदाब वाढला
By Admin | Updated: July 6, 2015 23:50 IST2015-07-06T23:50:54+5:302015-07-06T23:50:54+5:30
- रुग्णालयात दाखल

रमेश कदम यांचा रक्तदाब वाढला
- ुग्णालयात दाखलकोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) केलेल्या वैद्यकीय तपासणीत मोहोळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यांना येथील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष पथकही २४ तास लक्ष ठेवून आहे.पोलीस ठाण्यावर दगडफेक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर आमदार कदम यांना न्यायालयाने रविवारी ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना रविवारी सायंकाळी मोठ्या बंदोबस्तात कोल्हापुरात आणले आणि त्यांची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली. (प्रतिनिधी)