शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Baba Ramdev: रामदेव बाबांची ॲलोपॅथीवरून माघार; ते वक्तव्य घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 23:08 IST

Baba Ramdev statement on allopathy controversy: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. यानंतर रामदेव बाबांनी सपशेल शरणागती पत्करली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केले आहे.

ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी म्हटलं होतं. यावरून आयएमएने त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. यानंतर रामदेव बाबांनी सपशेल शरणागती पत्करली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केले आहे. (I withdraw my statement regretting this entire controversy on allopathy.: Ramdev Baba)

 हर्षवर्धन यांना ट्विट करताना त्यांनी तुमचे पत्र मिळाले. यासंदर्भात उपचार पद्धितींच्या या संघर्षपूर्ण वादाला मी इथे थांबवतो आणि मी केलेले वक्तव्य मागे घेतो असे रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी म्हटले आहे. 

"संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

 

ॲलोपॅथीला दिवाळखोरी ठरवणं दुर्दैव"कोरोनावरील उपचारांमध्ये ॲलोपॅथी चिकित्सेला तमाशा, निरुपयोगी आणि दिवाळखोरी ठरवणं अतिशय दुर्दैवी आहे. आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळेच कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर फक्त १.१३ टक्के आणि बरं होण्याचं प्रमाण ८८ टक्के इतकं आहे. यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचं सर्वात मोठं योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधनं ॲलोपथी उपचारांचीच नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचविण्यासारखं आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी अजिबात संतुष्ट नाही", असं रोखठोक मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्या