भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या ही संख्या 130 कोटींच्या घरात पोहोचली असून योगगुरु रामदेव बाबांनी पुढील 50 वर्षांत भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या पुढे जाता नये, अन्यथा मोठ्या समस्या निर्माण होतील असा इशाराच देऊन टाकला आहे.
भारताची लोकसंख्या 130 कोटींवर गेली आहे. यामुळे लोकांना सोई सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सोई पुरविण्यासाठी आपला देश तयार नसल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. याशिवाय लोकसंख्या वाढीला रोखण्यासाठी त्यांनी कायदा करण्याचेही सुचविले आहे.
सध्या तिसरे अपत्य असल्यास निवडणूक लढविण्यावर बंदी आहे. एखाद्याने तिसरे अपत्य असूनही ग्रामपंचायतची निवडणूक लढविल्यास त्याचे सदस्यपद बरखास्त केले जाते. चीनलाही लोकसंख्यावाढीची समस्या भेडसावत आहे. यामुळे तेथे एकच अपत्य बंधनकारक केले आहे.