Ramdas Athawale: "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याने प. बंगालमधील शिवसेना कार्यकर्ते रिपाइंत"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 15:27 IST2022-04-09T15:09:31+5:302022-04-09T15:27:48+5:30
शिवसेना नेते आणि आमदार तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत आपली नाराजी बोलून दाखवली

Ramdas Athawale: "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याने प. बंगालमधील शिवसेना कार्यकर्ते रिपाइंत"
मुंबई - राज्यातील राजकारणात विधानसभा निवडणुकांनंतर मोठा बदल पाहायला मिळाला. भाजपासोबत युतीत असलेल्या शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून सरकार स्थापन झालं आहे. त्यातूनच, कधी कधी शिवसेनेत नाराजीही दिसून येते.
शिवसेना नेते आणि आमदार तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत आपली नाराजी बोलून दाखवत, राष्ट्रवादी व काँग्रेसवर टीका केली होती. तर, पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. शिवसेनेचं हे पाऊल अनेकाना पटलं नाही. यातूनच, पश्चिम बंगालमधील शिवसेना कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेंच्या रिपलब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश केला आहे. स्वत: आठवलेंनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
आज कोलकाता येथे रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेच्या कार्यकर्ता संमेलन मध्ये आज पश्चिम बंगाल शिवसेने चे आयुष हलदर आणि सलील चंद्र महातो यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसेना कार्यकर्त्यानी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/s6OIYc4m7Q
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 8, 2022
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यामुळे शिवसेनेला कंटाळलेल्या पश्चिम बंगालमधील शिवसेना कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश केला. कोलकाता येथे रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेच्या कार्यकर्ता संमेलनात प. बंगाल शिवसेनेचे आयुष हलदर आणि सलील चंद्र महातो यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसेना कार्यकर्त्यानी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले.