शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

रमजान : इस्लाम धर्मातील पवित्र महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 01:05 IST

नमाज हाही एक प्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते.

- हुसेन मेमन, जव्हार

स्लामिक महिने चान्द्रिक कालगणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरुवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते, याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे. म्हणूनच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नतचे (स्वर्ग ) दार उघडले जातात व जहन्नमचे (नरक) दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे, त्यांनी पुढे व्हावे आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत, त्यांनी त्यापासून लांब थांबावे.

या महिन्यातील प्रमुख गोष्टी :१. रोजा, २. नमाज, तराविहची विशेष नमाज, ३. शबे कद्रची रात्र ४. कुरआन ५. जकातुल फित्र१. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सूर्योदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न-पाण्याचा एक कणसुद्धा खाणे-पिणे वर्ज्य असते. असे पूर्ण महिनाभर ३० दिवस चालते.

‘रोजा’मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्षे चालणाºया मशीनला, गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे, मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीररूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखी चांगले कार्य करावे म्हणून रोजा केला जातो. यामुळे शरीराची अन्न प्रक्रिया आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची ऊर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिकरीत्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरिबीची जाणीव करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवण न करता एक वेळ जेऊन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात, त्या वेदनांची जाणीव श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात.

श्रीमंत लोकांच्या मनात गरिबाबद्दल आदर, दया, आस्था व करुणाची भावना या रोजामुळे निर्माण होते. याचा परिणाम अन्नधान्य, दानधर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पेल्यात पडून बºयाच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.

रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवू शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत कमी सात वर्ष, अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे.२. तराविह (रात्रीची विशेष नमाज) : मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजरची नमाज, दुपारी जोहरची नमाज, दुपारी असरची नमाज (सूर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीबची नमाज आणि रात्री इशाची नमाज असे एकूण पाच नमाजआहेत.

नमाज हाही एक प्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाजची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहू अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब, सर्व जण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरिक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते. विविध मस्जिदीत या तराविहची विशेष नमाज मध्ये रोज कुरआणाचे पठण केले जाते.

३. शब-ऐ-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले.‘आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे.’(दिव्य कुरआन ९७:१)या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजीच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते किंबहुना इतर दिवसांच्या १००० महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.‘कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.’(दिव्य कुरआन ९७:३)

या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्त्व आहे, जो कोणी खºया भक्तिभावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुन्ह्यांची माफी मिळते, परंतु अट ही असते की, एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.

४. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्व श्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल्लाहू अलैही व सल्लम यांच्यावर अल्लाहकडून उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला. ‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.’(दिव्य कुरआन २:१८५)

जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी ३० खंड, ११४ अध्यायमध्ये करण्यात आली आहे. यात ६००० पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे १००० पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.

कुराण हा पवित्र ग्रंथ असून ता कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत: अल्लाहने स्वीकारलेली आहे. याच प्रमुख कारणामुळे आज चौदाशे-साडेचौदाशे वर्ष लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही आणि ईन्शाअल्लाह कयामतपर्यंत होणारही नाही.

‘उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वत: याचे संरक्षक आहोत.’(दिव्य कुरआन १५:९)

५.जकातुल फित्र (दानधर्म) -हा या महिन्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत, सधन आणि कमीत कमी चांगली आर्थिक परिस्थिती असणाºया कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे २.५ किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाखीची परिस्थिती असणाºया अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाची असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या त्योहारामध्ये सामील होता यावे.थोडक्यात, जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटुंबे दररोज उपाशी झोपतात. अशा परिस्थितीत या जकातूल फित्रचे महत्त्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकातूल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की, त्या कुटुंबाची वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.

वरील सर्वावरून आपल्या असे लक्षात येते की, रमजान आज रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविहची विशेष नमाज, शब-ऐ-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआण, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे.जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल, तोच खºया अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.

महिनाभराच्या उपवासानंतर चंद्रदर्शन होते. त्याच्या दुसºया दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरुष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिदमध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फितरची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजीनंतर एकमेकांना आलिंगन (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलाद