शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रामविलास पासवानांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 15:03 IST

रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात.

मुंबई: रालोआचे एक महत्त्वाचे मंत्री म्हणून ओळखले जाणारे रामविलास पासवान यांनी केलेल्या कालच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टी आणि रालोआने काँग्रेसप्रमाणे समाजातील सर्व स्तरांमध्य़े जाऊन सर्वसमावेशक धोरण अवलंबले पाहिजे असे विधान त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपाविरोधात राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी विविध नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केल्यानंतर रामविलास पासवान यांनीही सर्व पक्षातील दलित खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिले. दलित कार्डाचा वापर करुन रामविलास पासवान हे पुन्हा काही नवी खेळी किंवा बदल करु पाहतात का असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत.रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात. राजकीय दिशा आणि लोकांची मानसिकता ओळखून राजकीय कंपू बदलणारे नेते अशीही त्यांची ओळख आहे. एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी या पाच सलग पंतप्रधानांच्या काळात मंत्रिपदी राहाण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 1996 पासून आतापर्यंत काही अल्पकाळाचे अपवाद सोडल्यास त्यांच्याकडे रेल्वेमंत्रालयापासून माहिती तंत्रज्ञान खात्यापर्यंत विविध मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. २००२ साली गुजरात दंगलीनंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००४ पासून डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवले. २००९मध्ये त्यांच्या पक्षाला सपाटून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसविरोधात आलेल्य़ा मोदी लाटेचा अंदाज घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निर्णायाचा त्यांना चांगलाच फायदा झाला. रामविलास पासवान, त्यांचा मुलगा चिराग यांच्याबरोबर लोकजनशक्ती पार्टीचे सहा खासदार निवडून आले. आता पुन्हा मोदीलाट ओसरत असल्याचे दिसताच त्यांनी सूचक विधानं करणं सुरु केलं आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग याने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अपयश आल्यानंतरही सूचक ट्वीट केले आहे. पासवान हे राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन निर्णय घेणारे नेते आहेत असं मत ट्वीटरवर व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार