माझ्या हयातीतच राम मंदिर बांधले जावे - मोहन भागवत

By Admin | Updated: December 3, 2015 13:20 IST2015-12-03T13:19:35+5:302015-12-03T13:20:56+5:30

आपल्या हयातीतच राम मंदिर बांधले जावे अशी अपेक्षा आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.

Ram temple should be built in my lifetime - Mohan Bhagwat | माझ्या हयातीतच राम मंदिर बांधले जावे - मोहन भागवत

माझ्या हयातीतच राम मंदिर बांधले जावे - मोहन भागवत

ऑनलाईन लोकमत

कोलकाता, दि. ३ - अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर माझ्या हयातीतच बांधले जावे अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. 

माझ्या हयातीतच राम मंदिर बांधले जावे. जे आम्ही आमच्या डोळयाने पाहू शकू. कधी आणि कसे मंदिर उभारणार हे कोणी सांगू शकत नाही. पण आपल्याला तयार असले पाहिजे असे भागवत म्हणाले. 
ते राम कोठारी आणि शरद कोठारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. १९९० मध्ये कारसेवेदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात या दोघांचा मृत्यू झाला होता. 
आपल्याला जोश आणि होश ठेवून काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे. राम आणि शरद जे काम सुरु केले ते आपल्याला पूर्ण करायचे आहे असे भागवत म्हणाले. 

Web Title: Ram temple should be built in my lifetime - Mohan Bhagwat