राम मंदिर अयोध्येतच होणार - विनय कटियार

By Admin | Updated: March 29, 2017 12:55 IST2017-03-29T12:52:02+5:302017-03-29T12:55:26+5:30

वेळ प्रसंगी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अयोध्येत भव्य राम मंदिर निश्चित होणार असल्याचे भाजपाचे खासदार विनय कटियार यांनी म्हटले आहे

Ram Temple to be held in Ayodhya - Vinay Katiyar | राम मंदिर अयोध्येतच होणार - विनय कटियार

राम मंदिर अयोध्येतच होणार - विनय कटियार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - वेळ प्रसंगी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अयोध्येत भव्य राम मंदिर निश्चित होणार असल्याचे भाजपाचे खासदार विनय कटियार यांनी म्हटले आहे. हा भाजपचा मुख्य अजेंडा आहे, असेही ते म्हणाले. मंदिर अयोध्येतच होणार असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्याला  हवा दिली आहे. आज सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. 
अयोध्या मंदिराचा प्रश्न संवेदनशील आणि भावनिक असल्याचे सांगत, हा वाद सोडविण्यासाठी सर्व संबंधित पक्षांनी न्यायालयाबाहेर नव्याने प्रयत्न करावेत, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्याच दिला होता. यासाठी एकत्र बसून चर्चा करा, प्रसंगी मध्यस्थाची नियुक्ती करा आणि त्यासाठी वाटल्यास आम्ही मदत करू, असेही न्यायालयाने सांगितले. मात्र,कट्यार यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफळण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर बऱ्याच हिंदू संगठनांनी राममंदिर अयोध्येतच बांधण्यात यावे अशी मागणी केली आहे. अयोध्या येथील वादग्रस्त जागेवर राममंदिरच व्हावे, यासाठी विश्व हिंदू परिषद आग्रही आहे.

(राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाच्या बाहेरच सोडवा- सर्वोच्च न्यायालय)
 
 

Web Title: Ram Temple to be held in Ayodhya - Vinay Katiyar