भाजपा सरकारच्या काळातच उभारणार राम मंदिर - साक्षी महाराज

By Admin | Updated: June 7, 2015 18:58 IST2015-06-07T17:25:30+5:302015-06-07T18:58:31+5:30

भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळातच अयोध्येत राम मंदिर उभारणारच, असे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

Ram temple to be built during BJP government - Sakshi Maharaj | भाजपा सरकारच्या काळातच उभारणार राम मंदिर - साक्षी महाराज

भाजपा सरकारच्या काळातच उभारणार राम मंदिर - साक्षी महाराज

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळातच अयोध्येत राम मंदिर उभारणारच, असे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. साक्षी महाराजांच्या या वक्तव्यानंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
'आमच्या कार्यकालात मंदिर उभारण्यात येईलच. आज नाही तर उद्या पण मंदिर उभारूच. आमच्या कार्यकाळापैकी एकच वर्ष पूर्ण झाले आहे, अजून चार वर्ष बाकी आहेत' असेही ते म्हणाले. 
कादी दिवसांपूर्वीच भाजपा नेते विनय कटियार यांनी केलेल्या विधानामुळे राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला होता. ' राम मंदिराकडे दुर्लक्ष केल्यास रामभक्तांच्या असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो' असे कटियार यांनी म्हटले होते.
 

Web Title: Ram temple to be built during BJP government - Sakshi Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.