शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Ram-Setu: 'राम-सेतू' राष्ट्रीय स्मारक घोषित होणार ? लवकरच सर्वोच्च न्यायालय सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 14:23 IST

Ram Setu Bridge: भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यूपीए सरकारच्या काळात 'राम-सेतू'च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती.

Ram Setu Bridge: भारत आणि श्रीलंकादरम्यान असलेल्या 'राम-सेतू'ला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे आणि त्याचे संरक्षण व्हावे, या मागणीवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांना आश्वासन दिले की, या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी केली जाईल. 

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात सुरू झालेल्या 'सेतू समुद्रम' प्रकल्पांतर्गत जहाजांना जाण्यासाठी राम-सेतू पाडण्यात येणार होता. पण, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. तेव्हापासून राम-सेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर एनडीए सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, राम-सेतूचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला आहे. सरकार सेतू समुद्रम प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे. मात्र, राम-सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याबाबत सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

काय आहे राम सेतू?

तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्नार यांच्यामध्ये असलेल्या चुनखडीच्या साखळीला राम-सेतू म्हणतात. भूगर्भशास्त्रज्ञ मानतात की पूर्वी ही साखळी पूर्णपणे समुद्राच्या वर होती. यावरून श्रीलंकेपर्यंत चालता येत असे. हिंदू धर्मानुसार, हा सेतू रामायण काळात भगवान रामाच्या सैन्याने बांधलेला पूल मानला जातो. जगातील अनेक देश याला मानवनिर्मित असल्याचे मानतात. अॅडम्स ब्रिज असेही म्हणतात.

टॅग्स :ramayanरामायणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी