राम रहीमने किकू शारदाला केले माफ, १ लाख रुपयाच्या जामीनावर सुटका
By Admin | Updated: January 13, 2016 20:59 IST2016-01-13T20:59:11+5:302016-01-13T20:59:11+5:30
डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांची नकल करणारा अभिनेता किकू शारदाची १ लाख रुपयाच्या बॉन्डवर सुटका करण्यात आली आहे.

राम रहीमने किकू शारदाला केले माफ, १ लाख रुपयाच्या जामीनावर सुटका
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांची नकल करणारा अभिनेता किकू शारदाची १ लाख रुपयाच्या बॉन्डवर सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी विनोदी अभिनेता किकू शारदाला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु गुरमीत राम रहीम सिंग यांच्या पाठिराख्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.
किकूला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आले होते. 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात पलक म्हणून लोकप्रिय असलेल्या किकूने या कार्यक्रमात गुरमीत राम रहीम सिंग यांची नक्कल केली होती. २७ डिसेंबरच्या कार्यक्रमात त्याने गुरमीत राम रहीम सिंग यांची नक्कल केली होती. तर या प्रकरणी एक जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता.
जर किकू शारदाने माफी मागितली असेल तर माझी काही हरकत नाही असे मत डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा राम रहीम यांनी व्यक्त केले आहे.