उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदासाठी राम नाईक यांचा शपथविधी
By Admin | Updated: July 23, 2014 02:27 IST2014-07-23T02:27:31+5:302014-07-23T02:27:31+5:30
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे 27 वे राज्यपाल म्हणून राजभवनात शपथ घेतली.

उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदासाठी राम नाईक यांचा शपथविधी
लखनौ: भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे 27 वे राज्यपाल म्हणून राजभवनात शपथ घेतली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय वाय. चंद्रचूड यांनी 8क् वर्षीय नाईक यांना शपथ दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अनेक मंत्री, आमदार, वरिष्ठ नोकरशहा आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)