शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 07:28 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच भाजप २०२४ची तयारी सुरू करणार आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अयोध्येतील राम मंदिर हाच सर्वांत मोठा निवडणूक मुद्दा असेल. विरोधी पक्षांच्या जातनिहाय जनगणना व ओबीसी मतांच्या लढाईतही भाजप हाच सर्वांत योग्य मुद्दा मानत आहे. विद्यमान खासदारांपैकी यावेळी कोणाला तिकीट मिळेल, हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच खासदारांना सांगितले जाणार आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच भाजप २०२४ची तयारी सुरू करणार आहे. ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच भाजप खासदारांच्या राज्य व विभागवार बैठका बोलावून त्यांना रोडमॅपची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांनी तळागाळापर्यंत हा मुद्दा नेण्याचे काम सुरू केले आहे.  

निवडणुकीचा रोड मॅप-

अयोध्येतील राम मंदिर एकाच मुद्द्यावर भाजप लोकसभा निवडणूक लढवेल. गरीब कल्याण योजना, महिला आरक्षण, ओबीसीशी संबंधित योजनेसह इतर सर्व मुद्दे असले तरी सर्वांत मोठा मुद्दा मंदिर हाच असेल. या मुद्द्यावर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपल्या जाहीर सभेत राम मंदिराचा उल्लेख करताहेत व जनतेला अयोध्या दर्शन घडवण्याबद्दल सांगताहेत. १ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत संपूर्ण देशात राममय वातावरण तयार केले जाईल. फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होईल.

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले तर रामलल्ला दर्शनासाठी मोफत अयोध्यावारी घडवेन, असे आमिष मतदारांना दिले जात आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली आहे का? देशभरातील रामभक्तांसाठी मोफत अयोध्यावारी करून द्यावी.    - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख 

रामलल्लाचे मोफत दर्शन घडविण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी केंद्र सरकारमध्ये टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे नवे खाते सुरू केले असावे. तुम्ही केलेल्या कामांवर निवडणूक लढवा. राम मंदिर दर्शनाचे आमिष का दाखवता?    - राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे 

काँग्रेसप्रमाणेच उद्धव ठाकरेंनाही आता रामनामाची ॲलर्जी झाली आहे. काँग्रेसने प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते. आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात.  - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाBJPभाजपा