शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir : शेकडो मुस्लिमांनी सोडली अयोध्या; विहिंप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमुळे तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 13:14 IST

Ram Mandir : अयोध्येत रविवारी (25 नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांचा दौरा आणि धर्मसंसदेमुळे अयोध्येत तणावभीतीपोटी मुस्लिम नागरिकांचे स्थलांतर अयोध्येत डिसेंबर 1992मधील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये,हीच इच्छा

अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही हजार शिवसैनिकांसह रविवारी (25 नोव्हेंबर)अयोध्या दौरा करणार आहेत. याचदिवशी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेमुळे धडक कृती दल  (आरएएफ) आणि दहशतवादविरोधी पथकं अयोध्येत तैनात करुन सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आणि शिवसेनेच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथे प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं लोकांनी घरामध्ये अन्नधान्य भरण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येत डिसेंबर 1992 मध्ये मशीद पाडल्यानंतर देशभर जे प्रकार घडते, त्यामुळे स्थानिक लोक चिंतित आहेत. असे काही घडू नये, अशीच त्यांची इच्छा आहे. 

नॅशनल हेराल्डच्या वृत्तानुसार, भीतीपोटी जवळपास 3,500 मुस्लिमांनी शहर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून 24-25 नोव्हेंबरच्या राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. फैजाबादचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार सिंह यांनी आश्वासन दिले आहे की, मुस्लिम नागरिकांना पूर्णतः सुरक्षा पुरवण्यात येईल. कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. यादरम्यान, अयोध्येत धर्म संसदेची जोरदार तयारी सुरू आहे. विहिंपचे 1 लाखहून अधिक कार्यकर्ते कार्यक्रमासाठी हजर राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

मुस्लिम कुटुंबांचे स्थलांतर

25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची अयोध्येत रॅली निघणार आहे. शिवाय, याच दिवशीच विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. यामुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्या आणि परिसरात जमावबंदी लागू केली आहे. परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलेली असतानाही विश्व हिंदू परिषदेनं मोठा रोड शो केला आणि याद्वारे रविवारी होणाऱ्या धर्मसंसदेला आपला पाठिंबा जाहीर केला.

-विहिंपने अयोध्येच्या मुस्लीम वस्त्यांमधून रोड शो केला. त्यावेळी तिथे बाका प्रसंग उद्भवू नये म्हणून बंदोबस्त पाळण्यात आला. 

अनुचित प्रकार घडण्याच्या भयानं काही मुस्लिम कुटुंबे आपली घरेदारे तात्पुरती सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रयाला गेली आहेत, असे नगरसेवक हाजी असद यांनी सांगितले.

कडेकोट सुरक्षा व्यवस्थापोलीस प्रशासनाकडून देण्यता आलेल्या माहितीनुसार, अयोध्येत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी एक अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तराचे अधिकारी एक उप-पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अपर पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्राधिकारी, 160 पोलीस अधिकारी, 70 हवालदार, पीएसीच्या 42 आणि आरएएफच्या 5 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त एटीएसचे कंमाडो आणि ड्रोन कॅमेऱ्यानंही नजर ठेवण्यात येणार आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर