शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवलं जाणार नाही; दोन दिवसांत ट्रस्टचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 14:26 IST

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव म्हणतात; राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवणार ही तर अफवा

अयोध्या: पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जाऊन राम मंदिरासाठी भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. राम मंदिराच्या २ हजार फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवली जाणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधल्या एका सदस्यानं दोन दिवसांपूर्वी दिली होती. मात्र टाईम कॅप्सूलबद्दलची माहिती खोटी असल्याचं ट्रस्टच्या सचिवांनी सांगितलं आहे. राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सुल ठेवण्यात येईल, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याला त्या कॅप्सुलची मदत होईल. त्याला राम जन्मभूमीबद्दलचा महत्त्वपूर्ण तपशील त्यातून मिळेल, अशी माहिती चौपाल यांनी रविवारी (२६ जुलै) दिली होती. यानंतर आता दोनच दिवसांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी खुलासा केला आहे. ५ ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन करताना जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण राय यांनी दिलं. सचिव आणि सदस्य यांनी परस्परविरोधी माहिती दिल्यानं ट्रस्टमध्ये एकमत नाही का, त्यांच्यातच मतभेद आहेत का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

अयोध्येत जय्यत तयारी अयोध्येतील राम जन्मभूमीबद्दल ९ महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं ९ नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल दिला. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येला भेट देतील. मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल. या सोहळ्यासाठी असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं मोठी तयारी सुरू केली आहे. ४० किलो वजनाची चांदीची वीट ठेवून भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टनं दिली आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'...म्हणून अयोध्येतलं राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार; 'त्या' दोन वस्तूंशिवाय उभं राहणार

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या