शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

राम मंदिराच्या वेळेत बदल, आता भक्तांना दर्शन घेण्यासाठी मिळणार अधिक वेळ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:13 IST

Ram Mandir  : पूर्वी सकाळी ७ वाजल्यापासून दर्शन मिळत असे, परंतु आता भक्तांना जास्त वेळ दर्शन घेता येणार आहे.

Ram Mandir  : अयोध्येतील रामलल्लांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंदिरात दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता भक्तांना भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. पूर्वी सकाळी ७ वाजल्यापासून दर्शन मिळत असे, परंतु आता भक्तांना जास्त वेळ दर्शन घेता येणार आहे.

मंदिर ट्रस्टने सांगितले की, आता मंगला आरती पहाटे ४:०० वाजता होईल, जी दिवसाची पहिली आरती असेल आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद केले जातील. यानंतर सकाळी ६:०० वाजता शृंगार आरती होईल, त्यानंतर राम मंदिर सामान्य भाविकांसाठी उघडले जाईल.

याचबरोबर, मंदिरात दुपारी १२:०० वाजता राज भोगाची वेळ असणार आहे. यावेळी रामलल्लांना नैवेद्य अर्पण केला जाईल, परंतु या काळातही भक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता येईल. संध्याकाळी ७:०० वाजता आरती होईल, यावेळी मंदिराचे दरवाजे १५ मिनिटांसाठी बंद राहतील, परंतु दर्शनाची व्यवस्था कायम राहील. यानंतर रात्री १०:०० वाजता शयन आरती होईल, त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील. 

या नवीन बदलामुळे भक्तांना जास्त वेग रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, जुन्या पद्धतीनुसार, सकाळचे दर्शन सकाळी ७ वाजता सुरू होत होते आणि पूर्वी शयन आरती रात्री ९:३० वाजता होत होती. या नवीन बदलामुळे सकाळी १ तास ३० मिनिटे आणि संध्याकाळी ३० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खूप दिलासा मिळू शकतो.

राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, भाविकांना जास्त काळ भगवान दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता येईल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश