शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जे काही राहिलं आहे, ते सर्व व्यवस्थित करू; समान नागरी कायद्याबाबत अमित शाह यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:25 IST

शाह म्हणाले, कॉमन सिव्हिल कोड पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तराखंडमध्ये लागू केला जात आहे. ड्राफ्ट तयार केला जात आहे. जे काही राहिले आहे, ते सर्व व्यवस्थित करू.

राममंदिर, कलम 370, CAA आणि ट्रिपल तलाक सारखे मुद्दे संपले. आता नंबर कॉमन सिव्हिल कोडचा (समान नागरी संहिता), असे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह शुक्रवारी भोपाळ दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी येथील भाजप कार्यालायत कोअर कमिटिची बैठक घेतली, या बैठकीत ते बोलत होते. यामुळे, आता देशात लवकरच कॉमन सिव्हिल कोड लागू होण्याची शक्यता आहे.

शाह म्हणाले, कॉमन सिव्हिल कोड पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तराखंडमध्ये लागू केला जात आहे. ड्राफ्ट तयार केला जात आहे. जे काही राहिले आहे, ते सर्व व्यवस्थित करू. पण आपण पक्षाचे नुकसान होईल, असे कुठलेही काम करू नका.तत्पूर्वी शाह यांनी, देशात सर्व काही ठीक झाले? असा प्रश्न राज्यातील वरिष्ट नेत्यांना विचारला. यानंतर, त्यांनी कॉमन सिव्हिल कोड मुद्द्यावर चर्चा केली. एवढेच नाही, तर पुढील निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील. पण काळजी करण्याचे काही कारण नाही, काँग्रेसची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. कसलेही आव्हान नाही, असेही शाह म्हणाले.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. यानंतर, शाह BSF च्या विमानाने दिल्लीला परतले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार राकेश सिंह देखील त्यांच्यासोबत गेले.काय आहे कॉमन सिव्हिल कोड? थोडक्यात समजून घ्या  -कॉमन सिव्हिल कोड (समान नागरी संहिता) लागू झाल्यानंतर, देशात लग्न, घटस्फोट, वारसदार आणि दत्तक घेणे, यांसारखे सामाजिक प्रश्न एकाच कायद्यांतर्गत येतील. यात धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकराची वेगळी व्यवस्था नसेल. घटनेतील कलम 44 असा कायदा तयार करण्याची शक्ती देते. हा कायदा केवळ केंद्र सरकारच संसदेच्या माध्यमाने लागू करू शकते. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश