राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाच्या बाहेरच सोडवा- सर्वोच्च न्यायालय
By Admin | Updated: March 21, 2017 12:02 IST2017-03-21T11:56:10+5:302017-03-21T12:02:28+5:30
राम मंदिरचा मुद्दा कोर्टाच्या बाहेरच सोडवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाच्या बाहेरच सोडवा- सर्वोच्च न्यायालय
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - राम मंदिरचा मुद्दा कोर्टाच्या बाहेरच सोडवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राम मंदिरच्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई लढणा-या सुब्रमण्यम स्वामींना न्यायालयानं चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. गरज पडल्यास न्यायालय या प्रकरणात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.
या मुद्द्यावर दोन्ही पक्षकारांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. तरीही दोन्ही पक्षकार एकमेकांच्या मतांनी सहमत होत नसल्यास सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास तयार आहे, असंही कोर्ट सुनावणीदरम्यान म्हणाला आहे. सुब्रमण्यम स्वामींनी हे प्रकरण संवेदनशील असून, लवकरात लवकर यावर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं सुब्रमण्यम स्वामींना 31 मार्च किंवा त्याच्या आधी हा मुद्दा कोर्टासमोर ठेवण्यास सांगितलं होतं.
स्वामींनी कोर्टात सांगितलं की, रामाचा जन्म जेथे झाला, ती जागा बदलता येणार नाही. नमाज कोठेही पढता येतो. त्यानुसार स्वामींनीही या मुद्द्यावर मध्यस्थता करण्यास मी स्वतः तयार असल्याचंही सांगितलं आहे.