शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक निवडणुकीत आले ‘राम, हनुमान’; बजरंग दलावर कारवाई करण्याचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 08:28 IST

काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरून भाजप आक्रमक; काँग्रेसचा पाच योजनांचा पुनरुच्चार

होस्पेट (कर्नाटक) : काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हनुमानाची पूजा करणाऱ्यांना बंदिस्त करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने आधी भगवान रामाला कोंडून ठेवले होते आणि आता ‘जय बजरंग बली’ म्हणणाऱ्यांना बंद करायचे आहे. विजयनगर जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, मी हनुमानाच्या भूमीवर आलो आहे. मी भाग्यवान आहे की, मला हनुमानाच्या भूमीला वंदन करण्याची संधी मिळाली; पण दुर्दैव बघा की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात भगवान हनुमानाची पूजा करणाऱ्यांना बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे देशाचे दुर्दैव आहे की काँग्रेसला भगवान रामाची अडचण होती आणि आता ‘जय बजरंग बली’ म्हणणाऱ्यांची अडचण झाली आहे. भाजप कर्नाटकच्या सन्मान आणि संस्कृतीला कधीही धक्का लागू देणार नाही, असेही ते म्हणाले.

निवडणुकीचा स्तर घसरू देऊ नका : आयोगकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचा खालावलेला दर्जा पाहता निवडणुकीचा स्तर घसरू देऊ नका, अशी सूचना निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष, तसेच त्यांच्या स्टार प्रचारकांना केली. विशेष म्हणजे स्टार प्रचारकांकडून प्रचारादरम्यान अनुचित शब्द आणि भाषेचा वापर करण्यावरून आयोगाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

समाजात द्वेष पसरविणाऱ्या बजरंग दलावर कारवाई करणार 

जाती आणि धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सारख्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध आहे, असा शब्द काँग्रेसने कर्नाटकात आपल्या जाहीरनाम्यात दिला आहे.

काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यानंतर एका वर्षाच्या आत भाजप सरकारने केलेले सर्व अन्यायकारक कायदे आणि लोकविरोधी कायदे रद्द करण्याचे आश्वासनही यात देण्यात आले आहे.जाहीरनाम्यात म्हटले की, कायदा आणि संविधानाला आम्ही पवित्र मानतो. बजरंग दल, पीएफआय अथवा कोणी व्यक्ती किंवा द्वेष पसरविणाऱ्या संघटना भले त्या बहुसंख्य वा अल्पसंख्याकांमधील असतील त्यांना संविधानाचे उल्लंघन करू देणार नाही. अशा संघटनांवर बंदी घालण्यासह आम्ही निर्णायक कारवाई करू. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्न भाग्य, युवा निधी आणि शक्ती या पाच योजनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस