शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी हरियाणात सभा, रोड शोंचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:43 IST

१२ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व १२ जागांवर मतदान होत आहे. ५ ते १0 मे यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा आणि रोड शोंचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.

- बलवंत तक्षकचंदीगड -  १२ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व १२ जागांवर मतदान होत आहे. ५ ते १0 मे यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा आणि रोड शोंचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.अमित शहा हे ५ मे रोजी सोनिपत, करनाल आणि अंबाला या तीन मतदारसंघांत सभा घेणार आहेत. त्यानंतर ते भिवानी-महेंद्रगढमधील दादरी आणि हिस्सार भागात सभा घेतील. १0 मे रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरसा आणि रोहतक येथे दोन सभा घेणार आहेत. सोनिपत आणि रोहतक येथून पिता-पुत्र भूपेंद्रसिंग हुडा आणि दीपेंद्रसिंग हुडा यांना रोखण्यासाठी मोदी-शहा जोडी सर्व शक्ती पणाला लावताना दिसत आहे.राहुल गांधी हे ६ मे रोजी भिवानी-महेंद्रगढ क्षेत्रात सभा घेणार आहेत. ९ मे रोजी ते रोहतकमध्ये सभा घेणार आहेत. प्रियांका गांधी ७ मे रोजी अंबाला आणि हिस्सारमध्ये सभा घेणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी त्या रोहतकमध्ये ५ कि.मी. लांबीचा रोड शो करणार आहेत.हरियाणातील भाजपाची सूत्रे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हाती आहेत. राज्यातील सर्व १0 जागा भाजपाला मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांनी चकित करणारे निकाल लागतील, असे म्हटले आहे.सात जागा राखण्याचे आव्हानगेल्या वेळी मोदी लाटेत १0 पैकी ७ जागा भाजपने जिंकल्या होत्या. इंडियन नॅशनल लोकदलाला २ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली होती. यंदा दुष्यंत चौटाला यांनी लोकदलापासून दूर होऊन जननायक जनता पार्टीची स्थापना केली आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीHaryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019