शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Incident: “येत्या ८ दिवसांत अटक केली नाही तर देशव्यापी आंदोलन”; टिकैत यांचे योगी सरकारला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 08:20 IST

Lakhimpur Kheri Incident वरून योगी आणि मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचे योगी सरकारला अल्टिमेटमयेत्या ८ दिवसांत अटक केली नाही तर देशव्यापी आंदोलनलखीमपूर खिरी घटनेसंदर्भात आमचा विरोध कायम असून, तो शमलेला नाही

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri Incident) येथे झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. योगी आणि मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. यातच या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यानंतर आता भारतीय किसान युनियन (BKU) प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. येत्या ८ दिवसांत अटकसत्र सुरू झाले नाही, तर मोठे आंदोलन करू, असा इशारा टिकैत यांनी दिला. 

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला इशारा देत म्हटले आहे की, लखीमपूर खिरी घटनेप्रकरणी आगामी आठ दिवसांत अटकसत्र सुरू झाले नाही, तर राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येईल. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी टिकैत यांनी लावून धरली आहे. 

आमचा विरोध अजून शमलेला नाही

लखीमपूर खिरी घटनेसंदर्भात आमचा विरोध कायम असून, तो शमलेला नाही. आम्ही केवळ आठ दिवस प्रतीक्षा करू. आठ दिवसात सरकारकडून ठोस पावले उचचली गेली नाहीत. अटक झाली नाही, तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. सरकारशी झालेल्या चर्चेबाबत सर्वांनीच समाधान व्यक्त केले. मात्र, त्यानंतर सरकारने कारवाई करायला सुरुवात केली नाही, असा दावा टिकैत यांनी केला आहे. 

सरकारशी चर्चा केल्यानंतर विरोध प्रदर्शन स्थगित

लखीमपूर खिरी घटनेनंतर राकेश टिकैत आणि योगी सरकारमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर राकेश टिकैत यांनी विरोध प्रदर्शन थांबवले होते. लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल, अशी माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी यानंतर  दिली होती.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण