शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधक स्वतः उद्ध्वस्त होतील, आम्हालाही उद्ध्वस्त करतील", शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोठा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 12:40 IST

Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत शामलीच्या बाबरी भागातील भाजू गावात असलेल्या किसान पंचायतमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शामली : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) हे अनेकदा शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसून आले आहेत. मात्र, आता राकेश टिकैत यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांना आंदोलन करायचे नाही. ते स्वतः उद्ध्वस्त होतील, त्यांचे लोक आम्हालाही उद्ध्वस्त  करतील, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी नेते राकेश टिकैत शामलीच्या बाबरी भागातील भाजू गावात असलेल्या किसान पंचायतमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अप्रामाणिकपणा झाल्यास भाजपचाच उमेदवार देशाचा पंतप्रधान होईल. पण, निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या तर विरोधकांचा पंतप्रधान होईल."

कुस्तीपटूंच्या आंदोलनावर राकेश टिकैत म्हणाले की, भाजपचे सरकारला आम्ही महिला कुस्तीपटूंबद्दल चर्चा करायला लावली. असे करून आम्ही काही गुन्हा केला आहे का? केंद्र सरकार शेतकरी संघटनेची बदनामी करण्यासाठी बसले आहे. दरम्यान, राकेश टिकैत यांनी अनेकवेळा कुस्तीपटूंच्या पाठिंब्याबद्दल बोलले आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

"आम्ही फक्त एका सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत असे नाही. छत्तीसगड, हरयाणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. आमच्या आंदोलनाबाबत कोणताही पक्ष चुकीचे काम करेल, त्याला आम्ही तीव्र विरोध करू", असे राकेश टिकैत म्हणाले. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण यांच्यावर अलीकडेच महिला कुस्तीपटूंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही कुस्तीपटूंचे आंदोलन योग्य असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपा