शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Rajyasabha Elections: बिहारमध्ये एनडीएनं सर्व जागा जिंकल्या; ओडिसा- हरियाणामध्ये काय परिस्थिती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 22:19 IST

Rajyasabha Elections News: देशातील तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.

देशातील तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएने सर्व पाच जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर, ओडिशामध्ये क्रॉस व्होटिंगमुळे बीजेडीला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, हरियाणामध्ये मतांच्या वादावरून निकालाची घोषणा लांबणीवर पडली आहे. २०२६ ची ही राज्यसभा निवडणूक केवळ आकडेवारीची लढाई राहिली नसून ती राजकीय रणनीती आणि चाणक्यनीतीची मोठी परीक्षा ठरली आहे.

बिहारमध्ये एनडीएचा एकहाती विजय

बिहारमध्ये राज्यसभेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएने ५-० असा दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी हा मोठा पराभव मानला जात आहे. एनडीएकडून नितीश कुमार, नितीन नवीन, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह आणि शिवेश राम हे विजयी झाले आहेत. महाआघाडीचे ४ आमदार मतदानाला गैरहजर राहिल्याने विरोधी उमेदवार अमरेंद्र सिंह धारी यांचा पराभव झाला. या विजयामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपची पकड पुन्हा एकदा मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओडिशामध्ये क्रॉस-व्होटिंग'मुळे चित्र बदलले

ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजेडी पक्षाला अंतर्गत बंडाळीचा मोठा सामना करावा लागला. ४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बीजेडीचे ८ आणि काँग्रेसच्या ३ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार दिलीप रे यांना मतदान केले. क्रॉस-व्होटिंग'मध्ये सहभागी असलेल्या बीजेडी आमदारांमध्ये सौभिक बिस्वाल, देबीरंजन त्रिपाठी, सुभासिनी जेना, नबा मल्लिक, चक्रमाणी कन्हार आणि रामकांत भोई यांसारख्या नावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, यापूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आलेले दोन आमदार सनतन महाकुड आणि अरविंद महापात्र यांनीही पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात मतदान केले. घडलेल्या या घडामोडींकडे BJD प्रमुख नवीन पटनायक यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का म्हणून पाहिले जात आहे.

हरियाणात मतदानावरून हायव्होल्टेज ड्रामा, निकाल रखडला

हरियाणामध्ये ९० पैकी ८८ आमदारांनी मतदान केले. परंतु, ३ विशिष्ट मतांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे परमवीर सिंग, भारत बेनिवाल आणि भाजपचे अनिल विज यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे. आयोगाचा निर्णय येईपर्यंत हरियाणातील राज्यसभा निकालांची अधिकृत घोषणा प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajya Sabha Elections: NDA Dominates Bihar, Turmoil in Odisha, Haryana Awaits

Web Summary : NDA swept Bihar's Rajya Sabha seats. Odisha saw cross-voting impacting BJD, while Haryana's result is delayed due to disputed votes. Political strategies tested.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBiharबिहारRajasthanराजस्थानOdishaओदिशा