शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सोनं तस्करीच्या संशयावरून खासदार पुत्राची विमानतळावर कपडे काढून एक्स-रे तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 18:35 IST

याप्रकरणी राज्यसभा खासदार अब्दुल वहाब यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

सोन्याची तस्करी करत असल्याच्या संशयावरून मुस्लिम लीगचे राज्यसभा सदस्य अब्दुल वहाब यांच्या मुलाचे कपडे काढून एक्स-रे चाचणी केल्याची घटना केरळविमानतळावर घडली आहे. याप्रकरणी राज्यसभा सदस्य अब्दुल वहाब यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. तक्रारीत दावा केला आहे की, त्यांच्या मुलाला तिरुअनंतपूर विमानतळावर सुमारे एक तास रोखून ठेवण्यात आले आणि नंतर जबरदस्तीने एक्स-रे तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

खासदाराने आपल्या पत्रात म्हटले की, माझ्या मुलाला तिरुअनंतपूर विमानतळावर सुमारे एक तास रोखून ठेवण्यात आले. सुरुवातीला मुलाची कसून चौकशी केली आणि नंतर त्याच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. यानंतर कपडे काढून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये एक्स-रे करण्यासाठी नेण्यात आले. त्याने सोने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले किंवा गिळले असा संशय आल्याने त्याची कपडे काढून तपासणी केली. विमानतळावर आपण खासदाराचा मुलगा असल्याचे सांगितल्यानंतरही अधिकारी त्याची तपासणी करत राहिले, अशी माहिती खासदाराने पत्रात दिली.

मुलगा शहाजहानहून परतला होताखासदाराने सांगितले की, 1 नोव्हेंबर रोजी त्यांचा मुलगा शारजाहून एअर अरेबियाच्या विमानाने आला होता. एक्स-रे तपासणीनंतर सोने न सापडल्याने त्याला सोडून देण्यात आले. हिंदुस्तान टाईम्सशी फोनवर झालेल्या संभाषणात खासदाराने आपल्या मुलासोबत केलेले कृत्य अमानवी असल्याचे म्हटले आहे. निकषांचे उल्लंघन करणाऱ्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

अधिकारी काय म्हणाले?या प्रकरणाबाबत कस्टमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, गैरसमज झाल्यामुळे हे कृत्य झाले आहे. एअर अरेबियाच्या विमानातून याच नावाचा एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. सीमाशुल्क आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यात तफावत आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :KeralaकेरळGoldसोनंSmugglingतस्करीAirportविमानतळ