शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election 2018 : उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगमुळे बसपाचा उमेदवार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 12:40 IST

राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज निवडणूक होत आहे.

नवी दिल्ली -  राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज मतदान सुरू आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. यातील  6 जागा महाराष्ट्रातून आहेत. ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्र आणि बिहारमधील 6, मध्य प्रदेशातील 5 आणि आंध्र, ओडिशा, तेलंगणा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा, झारखंड 2, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल, हरियाणा आणि केरळसाठी प्रत्येकी एक-एक अशा जागा आहेत.  पैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले आहे. येथे बसपाचे आमदार अनिल सिंग यांनी क्रॉस व्होटिंग केल्याने बसपा उमेदवाराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

LIVE UPDATES :

 

 

 

10:43 AM लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीत बसपा आमदार अनिल सिंग यांनी केले क्रॉस व्होटिंग, भाजपा उमेदवाराला दिले मत   

 

राज्यसभेसाठी 8 राज्यांत झाली बिनविरोध निवड

महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे. बिहारमधून भाजपातर्फे रवीशंकर प्रसाद, जनता दल (संयुक्त) चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग, व महेंद्र प्रसाद सिंग, राजदचे मनोज सिन्हा व अश्फाक करीम आणि काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंग बिनविरोध निवडून आले.मध्य प्रदेशच्या पाच जागांसाठी थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान या दोन मंत्र्यांसह अजय प्रताप सोनी व कैलाश सोनी हे भाजपाचे चार व काँग्रेसचे राजमणी पटेल हे बिनविरोध निवडून आले. गुजरातच्या चार जागांवर भाजपातर्फे पुरुषोत्तम पुपाला व मनसुख मांडविया हे केंद्रीय मंत्री तर काँग्रेसतर्फे नारण राठवा व अमी याज्ञिक बिनविरोधी विजयी झाले आहेत. या खेपेस सर्वच पक्षांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. राजस्थानातून किरोरी मीना, भूपेंद्र यादव व मदनलाल सैनी हे तिघे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. मीना हे रविवारी भाजपामध्ये आले होते. राजस्थानात काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. राजस्थानातील एका जागेवर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचीही बिनविरोध निवड झाली. आंध्र प्रदेशातील तीन जागांवर तेलगू देसमचे सी. एम. रमेश व के. रवींद्र कुमार आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही. प्रभाकर रेड्डी विजयी झाले. हरयाणातील एका जागेवर भाजपाचे डी. पी. वत्स बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. तिथे भाजपाने अधिक उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होईल.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा