शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: तेजस्वी यादवांचा खेळ बिघडणार? मतदानाला न आलेले महाआघाडीचे ते चार आमदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:44 IST

Rajya Sabha Election 2026: बिहारमध्ये होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत एनडीए सर्व जागांवर विजयी होण्याची शक्यता बळावली आहे. कारण विजयासाठी लागणारा ४१ आकडा गाठण्यास महाआघाडीला अपयश आले. 

बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी मतदान होत आहे. सर्व जागांवर एनडीए जिंकण्याची शक्यता वाढली आहे. एआयएमआयएम आणि बसपाचा पाठिंबा घेऊनही महाआघाडीला जिंकण्यासाठी लागणाऱ्या ४१च्या आकड्यापर्यंत मजल मारता आली नाही. काँग्रेसचे तीन आणि राजदचा एक आमदार मतदान करण्यासाठी आलेच नाही. इतक्या महत्त्वाच्या निवडणुकीत चार आमदार मतदानाला न येणे, हा विरोधकांच्या एकजुटीला झटका असल्याचे मानले जात आहे. 

भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी ताकद लावली. त्यामुळे विरोधकांनी आकड्यांची जुळवा जुळव केली, पण चार आमदारांनीच महाआघाडीचे गणित बिघडवले आहे. मतदानाला दांडी मारणारे हे चार नेमके कोण आहेत?

सुरेंद्र कुशवाह 

वाल्मिकीनगरचे आमदार सुरेंद्र कुशवाह हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. २०१५ मध्येही कुशवाह यांनी आरएलएसपी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर कुशवाह काँग्रेसमध्ये आले होते. 

मनोज विश्वास 

फारबिसगंजचे आमदार मनोज विश्वास हे २२१ मतांनी निवडणुकीत जिंकले होते. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते राजद आणि जदयू पक्षात होते. २०१९ मध्ये जदयू प्रदेशाध्यक्ष होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 

मनोहर प्रसाद सिंह

मनोहर प्रसाद सिंह हे चौथ्यांदा आमदार बनले आहेत. अनुसूचित जातीतून येणारे मनोहर प्रसाद पहिल्यांदा जदयू असताना आमदार बनले होते. २०१५ मध्ये महाआघाडी बनली तेव्हा मनिहारी मतदारसंघा काँग्रेसच्या वाट्याला गेला होता. नितीश कुमारांच्या सांगण्यावरून ते काँग्रेसमध्ये गेले आणि तेव्हापासून ते काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून येत आहेत. 

फैसल रहमान 

माजी खासदार मोतीउर रहमान यांचे सुपुत्र असलेले फैसल रहमान हे राजदकडून राज्यसभेचे खासदारही राहिलेले आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते आमदार होते. ढाका मतदारसंघातून भाजपाच्या पवन जायस्वाल यांचा १७८ मतांनी पराभव करून ते विधानसभेत पोहोचले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajya Sabha Election: Tejashwi Yadav's plan fails? Four MLAs absent.

Web Summary : In Bihar, NDA likely to win Rajya Sabha seats as four Mahagathbandhan MLAs, including Congress and RJD members, skipped voting. This absence weakens opposition unity. Key absentees include Surendra Kushwaha, Manoj Vishwas, Manohar Prasad Singh and Faisal Rahman.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी