शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

राज्यसभा निवडणुकीत प. बंगालमधील एका जागेवर होणार चुरस; टीएमसीचं गणित बिघडू शकतं भाजप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:17 IST

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीतील राज्यांच्या विधानसभांचे अंकगणित पाहिल्यास गुजरातमधून भाजपच्या तीन सदस्यांची निवडणूक निश्चित मानली जाते, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभेत जुलै आणि ऑगस्टमध्ये 10 जागा रिक्त होत आहेत, ज्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (गुजरात) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) नेते डेरेक ओब्रायन (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. तसेच, इतर ज्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये गोव्यातील भाजपचे सदस्य विनय डी. तेंडुलकर, गुजरातमधील जुगलसिंह लोखंडवाला आणि दिनेशचंद अनावडिया, टीएमसी सदस्य डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि पश्चिम बंगालमधील सुखेंदू शेखर राय यांचा समावेश आहे. याशिवाय, काँग्रेस सदस्य प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे.

राज्यसभा निवडणुकीतील राज्यांच्या विधानसभांचे अंकगणित पाहिल्यास गुजरातमधून भाजपच्या तीन सदस्यांची निवडणूक निश्चित मानली जाते, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 157 सदस्य आहेत. जर मतदानाचा विचार केला तर एक जागा जिंकण्यासाठी 46 मतांची गरज आहे. तीनही जागा जिंकण्यासाठी 138 मतांची गरज आहे. अशा स्थितीत भाजप पुन्हा तीनही जागा जिंकणार हे निश्चित आहे. याचबरोबर गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत, त्यापैकी भाजपकडे 20 आणि तीन अपक्षही भाजपकडे आहेत. मतांच्या गणितानुसार, गोव्याची जागाही भाजपकडे जाणे निश्चित आहे. म्हणजेच भाजप यावेळी आपल्या चारपैकी चार जागा राखणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये काय आहे स्थिती? पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत असून त्यात काँग्रेसचे प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे एक जागा रिक्त होत आहे. विधानसभेत काँग्रेस शून्य आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातून ही जागा जाणार असल्याचे निश्चित आहे. बंगाल विधानसभेत 294 सदस्य आहेत आणि कोणत्याही उमेदवाराला राज्यसभेत पोहोचण्यासाठी 43 आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. एका जागेवर भाजपचा विजय निश्चित आहे. त्यानंतरही पक्षाकडे 34 आमदारांची मते असतील. तर टीएमसीला पाच जागा जिंकण्यासाठी 215 मतांची गरज आहे. टीएमसीचे काही आमदार तुरुंगात आहेत. अशा स्थितीत पाचवी जागा वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या गणितात थोड्याफार फरकाने टीएमसी मागे पडल्याचे दिसते. भाजपने दोन उमेदवार उभे केल्यास ही लढत रंजक ठरू शकते.

राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्षसध्या राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे 93 सदस्य आहेत. काँग्रेस 31 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीएमसीचे 12 खासदार आहेत. 10 जागांवर झालेल्या निवडणुकीनंतर राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ एका जागेच्या वाढीसह 93 वरून 94 वर पोहोचेल आणि एका जागेच्या नुकसानासह काँग्रेस 31 वरून 30 जागांवर येईल.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा