शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यसभा निवडणूक- दोन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 19:04 IST

कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंट आणि अमित शहा दाखवल्याचा आरोप करत कॉंग्रेसने त्यांची मते रद्द करण्याची मागणी केली

अहमदाबाद, दि. 8- गुजरातमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी चाललेल्या निवडणुकीत सतत नव्या घडमोडी घडत आहेत. आज सकाळपासून बलवंतसिंग राजपूत आणि अहमद पटेल लढवत असलेल्या जागेसाठी गुजरातच्या आमदारांनी मतदान केले. मात्र कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना दाखवल्याचा आरोप करत कॉंग्रेसने त्यांची मते रद्द करण्याची मागणी केली.

भोलाभाई आणि राघवजीभाई या दोघांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला दाखवल्याचे कॉंग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहील यांनी सांगितले आणि त्यांची मते रद्द करावीत अशी मागणी केली. तसेच त्यांनी मतपत्रिका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही दाखवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ही दोन मते रद्द व्हावीत अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आज दिवसभरामध्ये 176 आमदारांनी मतदान केले. आपला विजय निश्चित होईल असा विश्वास अहमद पटेल यांनी व्यक्त केला आहे. मात्र तरिही निकाल जाहीर होईपर्यंत काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे राजकीय विश्लेशकांनी मत मांडले आहे. कॉंग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातून अहमद पटेल हे कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात असल्याने ही निवडणूक कॉंग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची झाली.

अहमद पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांनी 1976 साली प्रवेश केला. 1977 पासून तीन टर्म ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर प्रदेश कॉंग्रेस आणि केंद्र पातळीवर त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यानंतर 1993-99, 1999-2005, 2005-2011, 2011-2017 अशा सलग चार टर्म ते राज्यसभेत आहेत. संपुआ सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.