शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:21 IST

Rajya Sabha Election Candidates: गुजरातमधील उमेदवारांचा विजय पक्का, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठी संधी.

BJP Rajya Sabha Election Candidates: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत गुजरात आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पश्चिम बंगालमधून अनंत महाराज तर गुजरातमधून बाबूभाई देसाई आणि केसरीदेव सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

24 जुलै रोजी राज्यसभेची निवडणूकगोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील एका जागेचा समावेश आहे.

कोण आहेत अनंत महाराज?अनंत महाराज हे राजवंशी समाजातील प्रभावी आहे. ते बंगालमधील अनुसूचित जाती (SC) मधून येतात. उत्तर बंगालमध्ये या समुदायाचे सुमारे 30 टक्के मतदार आहेत, जे 54 विधानसभा जागांवर निर्णायक भूमिका बजावतात. पश्चिम बंगालमधील कूचबिहार, दिनाजपूर आणि जलपाईगुडी जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे. अनंत महाराज हे ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

भाजपला मोठी संधीपश्चिम बंगालमधील 6 जागांपैकी 5 जागांवर टीएमसीचा तर एका जागेवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. जर भाजपचा उमेदवार विजयी झाला तर पश्चिम बंगालमधून भाजपचा नेता राज्यसभेवर निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

गुजरातमधील तीन उमेदवारदुसरीकडे, गुजरातमधील भाजपचे तीनही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची खात्री आहे. बाबूभाई हे माजी आमदार आहेत. द्वारकाधीश मंदिराच्या मुख्य देणगीदारांपैकी ते एक आहेत. तर केसरीदेव सिंग हे सौराष्ट्रातील वांकानेरच्या राजघराण्यातील आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBJPभाजपाGujaratगुजरातwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिका