शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा उपसभापती निवडणूक : काँग्रेसकडून बी.के. हरिप्रसाद यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:40 IST

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी होणारी राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार हरिवंश विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद अशी होणार आहे,. मात्र राज्यसभेतील संख्याबळाच्या खेळामध्ये सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 

राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेरच्या क्षणी हरिप्रसाद यांना उमेदवार घोषित करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी हरिप्रसाद यांना पक्षाचे उमेदवार घोषित केले आहे. दरम्यान, पक्षाने काही विचार करूनच आपल्याला उमेदवारी दिली आहे, अशी प्रतिक्रिया हरिप्रसाद यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली. 

 दरम्यान, एनडीएचे उमेदवार हरिवंश यांनी राज्यसभा उपसभापतीपदासाठी नामांकन दाखल केले. त्यावेळी एनडीएचे सर्व नेते उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे नेतेही नामांकन भरताना उपस्थित होते. सध्या राज्यसभेतील संख्याबळामध्ये एनडीएच्या हरिवंश यांना आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ 116 आहे. तसेच बीजेडीने पाठिंबा दिल्यानंतर ते वाढून 123 पर्यंत जाईल. मात्र एनडीएच्या उमेदवाराला 125 ते 128 मते मिळावीत, यासाठी भाजपाची टीम प्रयत्नशील आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे 118 सदस्यांचे पाठबळ आहे. या निवडणुकीत मित्रपक्षांनी काँग्रेसने आपला उमेदवार उभा करावा असा आग्रह धरल्याने काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते  बी.के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस