शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Raju Srivastav Health: राजू श्रीवास्तव यांच्या सुरक्षेत मोठी चूक; सेल्फी घेण्यासाठी आयसीयूत शिरला अज्ञात व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 17:47 IST

Raju Srivastav Health: राजू यांना संसर्गाचा धोका असल्यामुळे डॉक्टरांनी कुणालाही त्यांच्याजवळ जाण्यास मज्जाव केला आहे, पण अज्ञात व्यक्ती आत शिरल्याने मोठा गोंधळ उडाला.

Raju Srivastav Health: स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) व्हेंटिलेटरवर असून, गेल्या 13 दिवसांपासून दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते हळुहलू रिकव्हर होत आहे. राजू श्रीवास्तव बरे होतील, पण थोडा वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजू यांच्या आरोग्यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेत एक मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे.

चाहता आयसीयूत शिरलाएका ऑनलाइन मीडिया पोर्टलच्या वृत्तानुसार, राजू यांना जिथे ठेवण्यात आले आहे, त्या आयसीयूत एक अज्ञात व्यक्ती शिरला. हा व्यक्ती स्वतःला राजूचा चाहता म्हणवून घेत होता. या व्यक्तीला राजू श्रीवास्तवसोबत सेल्फी घ्यायचा होता. याची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर राजू श्रीवास्तव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या खोलीबाहेर एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे.

राजूला संसर्गाचा धोका काही दिवसांपूर्वी एम्सच्या डॉक्टरांनी राजूच्या कुटुंबीयांना राजू यांना ज्या ठिकाणी दाखल केले आहे तेथे जाण्यास नकार दिला होता. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना संसर्गाचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून राजू श्रीवास्तव यांच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नाही. पण अनोळखी व्यक्तीचे त्याच्याकडे येणे ही एका मोठ्या चिंतेपेक्षा कमी नाही. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

नेमकं काय झालं?राजू श्रीवास्तव यांना 9 ऑगस्ट रोजी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र, 18 ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या डॉक्टर राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत आहेत. यासोबतच त्यांचे चाहतेही लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

टॅग्स :Raju Shrivastavराजू श्रीवास्तवAIIMS hospitalएम्स रुग्णालय