शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी जम्मू-काश्मीरला जाणार, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 18:24 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशातील विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी राजू शेट्टी दिल्लीत आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, तेथील शेतकऱ्यांची स्थिती अंत्यत गंभीर आहे. राज्यघटनेतील ३७० चे कलम रद्द केल्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद तुटला आहे. देशाला सफरचंद पुरविणाऱ्यां या प्रदेशातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांकडे २० लाख सफरचंद साठलेला आहे. हे सफरचंद घ्यायला कुणीही तयार नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. तेथील शेतकऱ्यांशी संवाद केल्यानंतर राज्य व केंद्र सरकारला त्याची माहिती देऊ. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल पत्र लिहिले आहे. परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांचे सर्व अर्थव्यवस्था एकाच पिकावर अवलंबून आहे. सफरचंदचे पीक घ्यायला कुणी व्यापारी तयार नसेल तर त्यांना मोबदला मिळणार नाही. सरकारने बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करावी नाहीतर राज्य वा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली.शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीमहाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायला राज्य व केंद्रातील नेत्यांना वेळ कुठे आहे? यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये महापुराने मोठे नुकसान झाले. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी वा केंद्रातील नेते आले नव्हते. केंद्र व राज्य दोन्ही सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही. काँग्रेसच्या सरकारला किमान शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती होती. शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवायला सुद्धा हे सरकार तयार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagricultureशेतीPoliticsराजकारणJammu Kashmirजम्मू-काश्मीर