शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहिदाच्या वडिलांचा उद्वेग; चर्चेतून तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 15:03 IST

युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल.

काश्मीर: एकतर पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजौरी हल्ल्यातील शहीद हवालदार रोशन लाल यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले होते. यामध्ये सीमारेषेलगतच्या सांबा आणि कटुआ या दोन गावांमधील जवानांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.या पार्श्वभूमीवर शहीद रोशन लाल यांचे वृद्ध वडील देशराज पराशर यांच्यासह गावकऱ्यांनी केंद्र सरकारकला एक संदेश पाठवला आहे. एकतर तुम्ही पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर एकदाचे युद्ध करून काश्मीरमध्ये कायमची शांतता प्रस्थापित करा, असे देशराज पराशर यांनी म्हटले. रोशन लाल यांचे चुलत भाऊ संजय यांनीही दोन्ही देशांमधील तणावामुळे सीमारेषेरवरील गावकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा मांडला. या सगळ्यावर युद्ध हा अंतिम तोडगा नाही, हे आम्हाला माहिती आहे. परंतु, दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावामुळे आमच्या आयुष्याला काहीच अर्थ उरलेला नाही. पाकिस्तानकडून गोळीबार होतो, मग आपले जवान त्याला प्रत्युत्तर देतात, हे नेहमीच सुरु असते. मात्र, या सगळ्यात आमच्या मुलांना जीव गमवावा लागत आहे. युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल, असे त्यांनी सांगितले. शहीद रोशन लाल राहत असलेल्या नीचला या गावात 300 लोक राहतात. त्यापैकी 40 हून अधिकजण सैन्यात आहेत. रोशन लाल हे देशसेवा करताना शहीद झालेले गावातील पहिलेच जवान आहेत. तर येथूनच साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकूंदपूर येथील रायफलमन शुभम सिंह हेदेखील राजौरीमध्ये शहीद झाले होते. काही दिवसांतच त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न होणार होते. त्यासाठी त्यांच्या घराचे काम सुरू होते. हे काम बघायला शुभम सिंह एका महिन्याची सुट्टी काढून घरी परतले होते. 28 जानेवारीला ते पुन्हा कामावर रुजू झाले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.   

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानSoldierसैनिक