राजनाथ यांचे हेलिकॉप्टर भरकटले
By Admin | Updated: November 27, 2014 01:43 IST2014-11-27T01:43:31+5:302014-11-27T01:43:31+5:30
झारखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेसाठी आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर बुधवारी नक्षल प्रभावित भागात भरकटल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

राजनाथ यांचे हेलिकॉप्टर भरकटले
रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेसाठी आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर बुधवारी नक्षल प्रभावित भागात भरकटल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. राजनाथ यांचे हेलिकॉप्टर नक्षल प्रभावित भागात आठ मिनिटे घिरटया घालत होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून (एटीसी) संदेश न मिळाल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
वैमानिकाने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर अन्य ठिकाणी
सुखरूप उतरविले. नंतर हेलिकॉप्टर सुखरु प रांची एअरपोर्टवर
पोहोचले. या प्रकारामुळे राजनाथ यांची एक नियोजित जाहीर
सभा ऐनवेळी रद्द करावी
लागली. (वृत्तसंस्था)