आरोप सिध्द झाल्यास राजकारण सोडेन - राजनाथ सिंह
By Admin | Updated: August 27, 2014 16:44 IST2014-08-27T16:44:26+5:302014-08-27T16:44:26+5:30
आपला मुलगा पंकज सिंह याच्यावर केलेले आरोप जर सिध्द झाले तर आपण राजकारणातून संन्यास घेवू असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज मीडियाशी बोलताना दिले.

आरोप सिध्द झाल्यास राजकारण सोडेन - राजनाथ सिंह
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ - आपला मुलगा पंकज सिंह याच्यावर केलेले आरोप जर सिध्द झाले तर आपण राजकारणातून संन्यास घेवू असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज मीडियाशी बोलताना दिले. पंकज सिंह याच्यावर पोलीस अधिका-याची बदली करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला जात आहे.
आपल्या परिवाराबाबत चुकीची माहिती पसरविल्या जात आहे. ही माहिती कोण पसरवितोय याचा छडा लावणे कठिण असले तरी ती आता लवकरच बंद होईल असे राजनाथ म्हणाले. माझ्या परिवारातील कोणाही व्यक्तीवर लावण्यात आलेल्या आरोपांपैकी एक आरोप सिध्द झाला तर आपण राजकारणातून संन्यास घेवू असे राजनाथ यांनी सांगितले. दिल्लीत सुरू असलेल्या अफवा संदर्भात राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली त्यावेळी पंतप्रधानही ही माहिती ऐकून अवाक् झाल्याचे सिंह म्हणाले. पंतप्रधान कार्यालयाने हा सर्व प्रकार म्हणजे सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचे सांगत राजनाथ सिंह यांच्या मुलावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पंकज सिंह याने एका पोलीस अधिका-याची बदली करण्यासाठी लाच घेतल्याची माहिती असून ही माहिती पंतप्रधान मोदी यांना समजताच मोदी यांनी पंकज सिंह याला राजनाथ सिंह समक्ष ' हे काय चाललयं, कुणाचे पैसे घेतले ते परत कर, असे सांगत त्याला फटकारल्याची माहिती आहे. परंतू पंतप्रधान कार्यालय (पीएमओ ) आणि राजनाथ सिंह यांनी ही अफवा असल्याचे म्हटले आहे.