शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:44 IST

Rajnath Singh Jammu Kashmir: 'यापुढे भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल.'

Rajnath Singh Jammu Kashmir:ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी(15) जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचून जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा अणुबॉम्ब आयएईएच्या(IAEA) देखरेखीखाली आणण्याची मागणी केली. याशिवा त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, दोन्ही देशांनी युद्धविरामावार सहमती दर्शविली आहे. पण, पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचे नापाक कृत्य झाले, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. 

बेजबाबदार देशाच्या हातात अणुबॉम्ब सुरक्षित नाहीसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट दिली. यावेळी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी जगासमोर हा प्रश्न उपस्थित करू इच्छितो की, IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने पाकिस्तानची अण्वस्त्रे आपल्या नियंत्रणात घ्यावीत. आम्हाला त्यांच्या अणुबॉम्ब धमकीची पर्वा नाही. अशा बेजबाबदार देशाच्या हातात अणुबॉम्ब सुरक्षित आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न...पहलगाममधील दहशतवादी घटना घडवून भारताला दुखावण्याचा आणि भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी भारताच्या डोक्यावर हल्ला केला, आम्ही त्यांच्या छातीवर जखमा केल्या. ऑपरेशन सिंदूर ही भारताने त्याच्या इतिहासातील दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. आज भारताने संपूर्ण जगाला हे स्पष्ट केले आहे की, आम्ही दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाऊ शकतो. 

...तर युद्धाचे निमंत्रण मानले जाईलतुम्हाला आठवत असेल की, सुमारे एकवीस वर्षांपूर्वी याच पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये अटलजींसमोर घोषणा केली होती की, त्यांच्या भूमीतून आता दहशतवाद निर्यात केला जाणार नाही. पण पाकिस्तानने भारताशी विश्वासघात केला आणि आजही केला जात आहे. आता त्याला याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. जर दहशतवाद सुरूच राहिला तर ही किंमत वाढतच जाईल. भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल. आपल्या पंतप्रधानांनी हे देखील स्पष्ट केले आहे की दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत आणि जर संवाद असेल तर तो दहशतवाद आणि पीओकेवर असेल, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तान