शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Rajnath Singh: 'संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली', राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:15 IST

Rajnath Singh : 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही.'

Rajnath Singh: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समान नागरी संहिता कायद्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीशो बोलताना त्यांनी 'संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे,' असे वक्तव्य केले. यासह त्यांनी विविध विषयांवरही आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संरक्षण मंत्री ?यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'आता भारतात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी याचा विचार करावा. ज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली असेल किंवा करणार असतील, अशा राज्यांचे मी अभिनंदन करतो.' यावेळी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.'

गुजरातबाबत काय म्हणाले?गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, '2024कडे वाटचाल करत आहोत. फक्त गुजरातमध्येच नव्हे तर केंद्रातही मोदी सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारावर गुजरात जिंकतोय. पंतप्रधानांचे देशभरातील दौरे पहा, ते खूप मेहनत करतात. याचा परिणाम म्हणजे भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.'

खर्गेंच्या वक्तव्यावर नाराजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री म्हणाले की, 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात प्रतिष्ठा असली पाहिजे, खर्गे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही. पंतप्रधान ही व्यक्ती नसून संस्था आहे, अशी विधाने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शोभत नाहीत. काँग्रेस हताश आणि हतबल झाल्याचे दिसत आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे