...तरच आफ्सपा मागे घेणार राजनाथसिंह यांची स्पष्टोक्ती : शेजार्‍यांसोबत मित्रत्वाचेच संबंध हवेत

By Admin | Updated: July 2, 2015 23:47 IST2015-07-02T23:47:28+5:302015-07-02T23:47:28+5:30

श्रीनगर : स्थिती अनुकूल असेल त्यावेळी जम्मू-काश्मिरातील वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफ्सपा) हटविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

Rajnath Singh clarifies his withdrawal of AFSPA: Friendship should be shared with neighbors | ...तरच आफ्सपा मागे घेणार राजनाथसिंह यांची स्पष्टोक्ती : शेजार्‍यांसोबत मित्रत्वाचेच संबंध हवेत

...तरच आफ्सपा मागे घेणार राजनाथसिंह यांची स्पष्टोक्ती : शेजार्‍यांसोबत मित्रत्वाचेच संबंध हवेत

रीनगर : स्थिती अनुकूल असेल त्यावेळी जम्मू-काश्मिरातील वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफ्सपा) हटविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राज्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आलेल्या राजनाथसिंह यांनी सर्वप्रथम अमरनाथ गुफा मंदिरात पूजाअर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जम्मू-काश्मिरातील स्थिती लवकरात लवकर अनुकूल व्हावी, अशी आमची इच्छा आहे. याशिवाय देशात कुठेही आफ्सपा लावण्याची वेळ येऊ नये, अशी मी देवाला प्रार्थना करील, असे राजनाथ म्हणाले. फुटीरवाद्यांशी चर्चेसंदर्भात सरकारकडे कुठलाही प्रस्ताव नाही. कुणाशीही चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मात्र राष्ट्रविरोधी कारवायांचा विरोध केला गेला पाहिजे.जम्मू-काश्मिरातील सुरक्षा स्थिती बिघडू दिली जाणार नाही; पण यासाठी जनतेचे सहकार्यही गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आफ्सपा रद्द करणे हा जम्मू-काश्मिरातील भाजप-पीडीपी आघाडी सरकारमधील किमान समान कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. याच आधारावर राज्यात भाजप-पीडीपी आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ यांची उपरोक्त स्पष्टोक्ती महत्त्वपूर्ण आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी आफ्सपा हटविण्यास विरोध करीत, याबाबतचा निर्णय राजकारण्यांना नाही, तर सुरक्षा दलांना करायचा आहे, असे म्हटले होते. पीडीपीने जितेंद्र यांच्या या भूमिकेला जोरदार विरोध केला होता.

बॉक्स
शेजार्‍यांसोबत मित्रत्वाचीच अपेक्षा
पाकिस्तानसह आपल्या सर्व शेजार्‍यांसोबत भारताला मित्रत्वाचे संबंध हवे आहेत. पाकिस्तानने यावर विचार करायला हवा, असे राजनाथसिंह म्हणाले. आपण मित्र बदलू शकतो, शेजारी नाही, असे अटलजी म्हणत. आमचाही यावर विश्वास आहे. आम्हाला आपल्या शेजारी देशांसोबत शांतता आणि सौहार्दपूर्ण सबंधांचीच अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

बॉक्स
अमरनाथ यात्रेचा औपचारिक शुभारंभ
केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी दक्षिण हिमालयातील पवित्र अमरनाथ गुफा मंदिरात पूजाअर्चा करून ५९ दिवसीय अमरनाथ यात्रेचा औपचारिक शुभारंभ केला. राजनाथ सकाळी हेलिकॉप्टरने अमरनाथ गुफा मंदिरात पोहोचले आणि पवित्र हिमलिंगाचे दर्शन घेतले. या दरम्यान काही भाविकांशीही त्यांनी संवाद साधला.

Web Title: Rajnath Singh clarifies his withdrawal of AFSPA: Friendship should be shared with neighbors