शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राजीव प्रताप रूडी यांच्यासह सहा मंत्र्यांचा राजीनामा, केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 23:16 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनंतर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते. 

नवी दिल्ली, दि.31 -केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनंतर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते. 

केंद्रीय कौशल्य विकास मंत्री आणि भाजपाचे बिहारचे नेते राजीव प्रताप रूडी, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती तसेच आरोग्य राज्यमंत्री फागनसिंह कुलस्ते यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच संजीव बलियान, कलराज मिश्रा, महेंद्र पंड्या या मंत्र्यांनीही राजीनामा दिल्याचे कळते.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौ-यावर जाणार आहेत. तर राष्ट्रपती तिरूपती येथून शनिवारी दिल्लीला परतणार आहेत. त्यामुळे शनिवारी सायंकाळी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. मात्र, अण्णा द्रमुकने यासाठी काहीसा वेळ मागितला असून, त्यामुळे सध्या केवळ मंत्रिमंडळात फेरबदल केला जाऊ शकतो. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौ-यावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपा