राजीव माथूर नवे मुख्य माहिती आयुक्त
By Admin | Updated: May 23, 2014 00:14 IST2014-05-23T00:14:30+5:302014-05-23T00:14:30+5:30
गुप्तचर विभागाचे (आयबी) माजी प्रमुख राजीव माथूर यांनी आज गुरुवारी केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला़

राजीव माथूर नवे मुख्य माहिती आयुक्त
नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे (आयबी) माजी प्रमुख राजीव माथूर यांनी आज गुरुवारी केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला़ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पदाची शपथ दिली़ ६४ वर्षीय माथूर सहावे मुख्य आयुक्त असतील़ ते सुषमा सिंह यांची जागा घेतील़ मावळते पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय निवड समितीने माथूर यांच्या नावाची शिफारस केली होती़ त्यांचा कार्यकाळ २३ आॅगस्टपर्यंत(वयाची ६५वर्षे पूर्ण होईपर्यंत) असेल़ नियमानुसार, मुख्य माहिती आयुक्तपदाचा कार्यकाळ जास्तीत जास्त पाच वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल तेवढा असतो़ उत्तर प्रदेश कॅडरचे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी असलेले माथूर ३१ डिसेंबर २००८ पासून दोन वर्षे आयबीचे संचालक राहिले़ मार्च २०१२ मध्ये त्यांनी केंद्रीय माहिती आयोगात माहिती आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क) अपील आणि तक्रारींना बोझा कमी करणे आणि माहिती अधिकार कायदा आणखी सशक्त करण्यास यास माझे प्राधान्य असेल़ अनेक सरकारी विभागांद्वारे माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ ची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, हेही काम प्राधान्याने केले जाईल, असे मुख्य माहिती आयुक्त राजीव माथूर,